- तर, पिंपळे सौदागर परिसरातील एकजण कोरोनामुक्त…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ मे २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात आज दुपारी आलेल्या अहवालानुसार एका ७८ वर्षीय वृद्धाला तर ३५ वर्षीय पुरुषाला कोरोनाची लागण झालेली आहे. हे दोघे पिंपळे सौदागर व फुगेवाडीतील रहिवासी आहेत. त्यामुळे शहरातील कोरोनाबाधीतांचा आकडा १८८ वर पोहोचला असून ५९ रुग्ण महापालिकेच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल आहेत.
तसेच वायसीएम रुग्णालयात दाखल पिंपळे सौदागर परिसरातील एका रुग्णाला घरी सोडण्यात आले असून, त्यात पुण्यातील गंजपेठ परिसरातील एकाचा समावेश आहे. त्यामुळे शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ११७ वर पोहोचली आहे.