न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ मे २०२०) :- थेरगावच्या पवना नदी घाटाजवळ अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला होता. हा प्रकार शुक्रवारी सायंकाळी सातच्या सुमारास उघडकीस आला होता.
मृतदेहाची ओळख पटली असून, मुलबाळ नसल्याने ती एकटीच रहात असल्याची माहितीसमोर आली. वेडाच्या भरात पाण्यात पडून मृत्यू झाल्याचे पोलिसांना सांगण्यात आले. त्यानंतर तिच्या मावशीच्या उपस्थितीत सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने पोलिसांनीच महिलेवर अंत्यसंस्कार केले. शोभा सुभाष टेके (वय ५५, रा . चिंचवडेनगर, चिंचवडगाव) असे मृत महिलेचे नाव आहे.















