- आज सांगवीसह पुण्यातील तीनजण कोरोनामुक्त..
- पिंपळे सौदागर, रुपीनगरमधील परिसर मध्यरात्रीपासून सील…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ मे २०२०) :- शहरात आज शनिवारी सायंकाळी आलेल्या अहवालानुसार सात जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आलेला आहे. यात ३ पुरुष आणि ४ महिलांचा समावेश आहे. हे रुग्ण चिंचवड स्टेशन, रुपीनगर येथील रहिवासी असून ते पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल आहेत. पुरुषांची वयं १८, ३२, ३४ वर्षे असून महिलांची वयं अनुक्रमे ६४,२४,१४,१७ वर्षे अशी आहेत. तसेच पुण्यातील ताडीवाला रोड परिसरातील एका ४७ वर्षीय पुरुषाला देखील कोरोनाची बाधा झाली आहे.
तसेच आज सांगवी व पुणे येथील रहिवासी असलेल्या तीन कोविड – १९ बाधित रुग्णांचा दोन्ही वेळचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
आज पिंपळे सौदागरमधील साई पैराडाईजमधील साई साहेब सोसायटी शेजारी – अंतर्गत रस्ता – अंतर्गत रस्ता – न्यु पूना बेकरी – शिव साई लेन रोड – साई साहेब सोसायटी शेजारील परिसर तसेच रुपीनगरमधील पंचदुर्गा सहकारी गृहनिर्माण संस्था परिसरातील सिध्दीविनायक गणपती मंदिर – मिनारा मशिद – माउली मेडिकल – हमराज टेलर्स – रुपीनगर पोस्ट ऑफिस – रुपीनगर रोड – सिध्दीविनायक गणपती मंदिर परिसर मध्यरात्री ११.०० वाजलेपासून पुढील आदेशापर्यंत सील करण्यात येत आहे. सदर परिसराच्या हद्दीमध्ये पुढील आदेशापर्यंत प्रवेशबंदी व परिसरातून बाहेर पडण्यास नागरिकांना बदी केलेली आहे. सील केलेल्या परिसरातील प्रत्येक नागरिकाने तोंडाला मास्क लावणे बंधनकारक आहे.