न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ मे २०२०) :- पुण्याला करोनाचा विळखा दिवसागणिक वाढतच आहे. शनिवारी पुण्यातील सदाशिव पेठेत एका दुकानातील ३८ कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाल्याचं समोर आले आहे.
करोना बाधित असलेले ३८ रुग्ण हे शहरातील मेडिकलच्या दुकानात औषधांची डिलिव्हिरी करत होते. औषधं मेडिकलमध्ये पोहचवणाऱ्यांना करोना झाल्यामुळे शहरात चिंतेचे आणि भितीचे वातावरण निर्माण झालं आहे.
एकाच दुकानातील ३८ जण आणि अन्य एका दुकानातील पाच जणांना करोनाचा संसर्ग झाल्याची माहिती केमिस्ट असोसिएशनचे सचिव अनिल बेलकर यांनी दिली आहे. शहरात औषधं पोहचवणाऱ्या कर्मचाऱ्यांना करोना झाल्यामुळे आज दुपारपर्यंत नवीन नियमावली तयार करणार असल्याचेही ते म्हणाले.


















