- पिंपळे गुरव, संभाजीनगर, आनंदनगर परिसरातील तिघांना कोरोनाची बाधा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ मे २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाचे थैमान थांबताना दिसून येत नाही. दिवसेंदिवस कोरोनाचे अतिक्रमण वाढत आहे. आज रविवारी सकाळी प्राप्त अहवालानुसार आणखी तिघांना कोरोनाची बाधा झालेली आहे.
यात २७ आणि ५० वर्षीय दोन पुरुष तर, एका ४० वर्षीय महिलेचा समावेश आहे. हे तिन्ही रुग्ण पिंपळे गुरव, चिंचवडमधील संभाजीनगर तर चिंचवड स्टेशन परिसरातील आनंदनगर परिसरातील रहिवासी आहेत. त्यामुळे शहरातील सक्रीय कोरोना रुग्णांचा आकडा १९८ वर पोहोचला असून महापालिकेच्या रुग्णालयात ६५ रुग्ण उपचार घेत आहेत. आजपर्यंत ११९ रुग्ण महापालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असून, शहरातील चार जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे.















