- पिंपळे सौदागरमध्ये शत्रुघ्न काटे युथ फाउंडेशनच्या वतीने सॅनीटायझर, मास्कचे वाटप…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ मे. २०२०) :- देशात व राज्यात लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरू झाला असून, लॉकडाऊन आता ३१ मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर शत्रुघ्न काटे यांनी पिंपळे सौदागरच्या नागरिकांशी संवाद साधला. आरोग्याची काळजी घेण्याच्या सुचनाही केल्या. त्यांच्या आरोग्याची विचारपूस केली. ‘तुम्ही खबरदारी घ्या, आम्ही जबाबदारी घेतो’ असे आवाहन नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी यावेळी केले.
या दरम्यान शत्रुघ्न काटे युथ फाउंडेशनच्या वतीने पिंपळे सौदागरमधील पंधरा हजार कुटुंबियांना सॅनीटायझर, ट्रीपल लेअरच्या चार मास्कचे वाटप केले.
तसेच आपल्या जिवाची काळजी न करता परिस्थितीशी झुंज देणाऱ्या डॉक्टर, पोलिस आणि सफाई कर्मचाऱ्यांचे विशेष आभार काटे यांनी व्यक्त केले.


















