न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ मे. २०२०) :- पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणात सध्या सुमारे ४८ टक्के पाणीसाठा असून, तो जुलै अखेरपर्यंत पुरेल इतका आहे. दिवसाआड पाणीपुरवठा कायम राहणार आहे, असे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे.
शहराला सुरळीत पाणीपुरवठा व्हावा यासाठी पालिकेने २५ नोव्हेंबर २०१९ पासून दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला. दोन दिवसांचे पाणी एका दिवसात दिले जात असल्याचा पालिका प्रशासनाचा दावा आहे. मार्च महिन्यात कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू झाला. त्यामुळे सर्वच व्यवहार बंद आहेत. या काळात पाण्याचा वापर वाढला असला तरी तक्रारी खूपच कमी झाल्या आहेत. तसेच, ऐन उन्हाळ्यात पाण्याच्या टँकरची मागणीही लक्षणीय घटली आहे, असे पाणीपुरवठा अधिकाऱ्यांचे म्हणने आहे.


















