न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ मे. २०२०) :- सध्या संपूर्ण जगात, देशात व महाराष्ट्र राज्यात देखील कोविड १९ कोरोनाची फार मोठी साथ आहे. यात खरे देवदूत जर कोणी असतील तर ते म्हणजे डाॅक्टर, नर्स, कर्तव्यदक्ष पोलिस वर्ग व सफाई कर्मचारी. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी युवती काँग्रेस अध्यक्षा कु. वर्षा जगताप यांनी प्रथमच पिंपरी चिंचवड शहरातील संत तुकाराम नगर येथील पोलीस चौकीत सॅनिटायजर स्टॅन्ड उपलब्ध करून दिले आहेत.
तसेच शहरातील अनेक रहदारीच्या ठिकाणी हे स्टॅन्ड उपलब्ध करून देण्याचा त्यांचा मानस आहे. परंतु प्रायोगिक तत्वावर त्यांनी संत तुकाराम नगर येथील पोलीस चौकी येथे उपलब्ध करून दिले आहे.
यावेळी प्रमुख उपस्थितीत पिंपरी चिंचवड मनपा चे माजी महापौर योगेश बहल, शिक्षण मंडळाचे माजी सभापती फजल शेख, सुधीर चव्हाण सहाय्यक पोलीस निरीक्षक, रमेश केंगार पोलीस उपनिरीक्षक, सतेश जाधव पोलीस उपनिरीक्षक, पालवे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, बंडू खाडे पोलीस नाईक, तसेच बाळासाहेब जगताप, सुनील जगताप उपस्थित होते.


















