न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ मे. २०२०) :- कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महापौर, आयुक्त व पदाधिकारी यांचे सोबत आज आयुक्त यांचे दालनात बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीत कोरोना संकटावर मात करण्यासाठी महानगरपालिकेची आजची परीस्थिति व भविष्यात करावयाच्या उपाययोजना बाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
महापौर उषा ऊर्फ माई ढोरे यांनी बाजारपेठेतील, भाजी मंडईतील गर्दी टाळण्याच्या दुष्टीने नागरिकांसाठी सुयोग्य अशी वेळ उपलब्ध करुन दयावी. कोरोना बाधित रुग्ण हाताळताना आरोग्य सेवकांना कोरोना पासून बचाव करणेकामी संपूर्ण सुरक्षा कवच देण्यात यावे. मृतदेह हाताळताना कर्मचा-यांनी सुरक्षा बाळगावी अशा सूचना केल्या.
आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी महापौर उषा ऊर्फ माई ढोरे यांनी केलेल्या सूचनांचा विचार करुन संबधित अधिका-यांना उपाययोजना राबविणे बाबतचे आदेश दिले. यावेळी उपमहापौर तुषार हिंगे, स्थायी समिती सभापती संतोष आण्णा लोंढे, पक्षनेते नामदेव ढाके, विरोधी पक्षनेते विठठल ऊर्फ नाना काटे, शिवसेना गटनेते राहूल कलाटे,मनसे गटनेते सचिन चिखले, अपक्ष आघाडी गटनेते कैलास बारणे, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, अजित पवार, अतिरिक्त आरोग्य वैदयकीय अधिकारी डॉ.पवन साळवे, महिला वैदयकीय अधिकारी डॉ वर्षा डांगे, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे आदी उपस्थित होते.
महापौर उषा ऊर्फ माई ढोरे यांनी नागरीकांना कोरोना पासून बचाव करण्यासाठी आपले हात साबणाने स्वच्छ धुवावेत, मास्क व सॅनिटायझरचा वापर करावा, तसेच सुरक्षित अंतर ठेवावे, असे आवाहन यावेळी केले.















