न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ मे. २०२०) :- कोरोना प्रादुर्भावामुळे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या ( सीबीएसई ) इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षा स्थगित करण्यात आल्या होत्या. आता या परीक्षा दि. १ ते १५ जुलैदरम्यान घेण्यात येणार आहे. यात उर्वरित विषयांच्या परीक्षांचे वेळापत्रक ही सोमवारी (दि.१८) जाहीर करण्यात आले आहे.
केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशांक यांनी टिटवरून या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. इयत्ता बारावीची परीक्षा जुलैमध्ये होणार आहे. यासोबतच उत्तर दिल्लीत सीबीएसीईची दहावीची परीक्षादेखील याच कालावधीत आहे. लॉकडाऊनमुळे सीबीएसईच्या मार्च मधील परीक्षा थांबवण्यात आल्या होत्या. सीबीएसीच्या ३ हजार शाळांमध्ये परीक्षा केंद्रांची व्यवस्था करण्यात येणार आहे.















