- आज मध्यरात्रीपासून भोसरी व वडमुखवाडीतील परिसर सील…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ मे. २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात आज मंगळवारी सकाळ व दुपारच्या सत्रात तब्बल सात जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सुदैवाने सायंकाळी कोरोनाचे रुग्ण आढळले नाहीत. तसेच आज भोसरीतील दोन जणांचा मृत्यूही झालेला आहे. पिंपरी चिंचवड शहरातील आजपर्यंत सकारात्मक रुग्णांची संख्या २३३ वर पोहोचली आहे. आजपावतो महापालिकेच्या रुग्णालयात उपचारासाठी ८४ रुग्ण दाखल आहेत.
तसेच आज भोसरीतील क्षितीज डेस्टीनेशन परिसरातील भारत पेट्रोलीयम पंप, ग्लोबल स्कुल, दुर्वांकुर लॉन्स मागील बाजू, बनाचा ओढा, सिमेंट ग्राऊड, महालक्ष्मी जनरल स्टोअर ए १, चायनिज सेंटर, भारत पेट्रोलीयम पंप परिसर,
तसेच वड्मुखवाडीतील अलंकापुरम रोड परिसरातील श्री समर्थ गेरेज, शिवराज ग्रीन टेक, अलंकापुरम रोड, नील मोटर्स, श्री समर्थ गेरज हा परिसर आज मध्यरात्री ११.०० वाजलेपासून कन्टेनमेंट झोन घोषीत करुन पुढील आदेशापर्यंत सील करण्यात आलेला आहे. सदर परिसराच्या हद्दीमध्ये पुढील आदेशापर्यंत प्रवेशबंदी व परिसरातून बाहेर पडण्यामस नागरिकांना बंदी केलेली आहे. सील केलेल्या परिसरातील प्रत्येक नागरिकाने तोंडाला मास्क लावणे बंधनकारक आहे.















