न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ मे. २०२०) :- नागसेन नगर झोपडपट्टी, बिजलीनगर येथे सोमवारी रात्री दहाच्या सुमारास आरोपींनी रस्त्यावर पार्क केलेल्या टेम्पो, रिक्षा या वाहनांच्या काचा फोडून नुकसान केले. एकाला लाकडी दांडक्याने व दगडाने मारून जखमी केले.
जमलेल्या लोकांना हातातील कोयते, लाकडी दांडके यांचा धाक दाखवून दहशत निर्माण केली. तसेच आरोपींनी शिवीगाळ करून धमकी दिली. याप्रकरणी सतीश रोहिदास राठोड (वय २४, रा. नागसेननगर झोपडपट्टी, बिजलीनगर) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
ज्ञानेश्वर शिंदे, गल्या उर्फ रोहित चव्हाण (वय २१, दोघे रा. नागसेन नगर झोपडपट्टी, बिजलीनगर चिंचवड), बाळा ढकोलिया (रा. रमाबाई नगर झोपडपट्टी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. यांच्यासह भट्ट्या उर्फ वैभव थोरात (वय २२), योग्या उर्फ योगेश गायकवाड (वय २३), अनिकेत भोगे, सुरज कांबळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.















