- तळवडे, मोशी, जुनी सांगवी, खराळवाडीतील सातजण कोरोनामुक्त…
- पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील संख्याही पोहोचली सातवर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० मे २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात महापालिका अंतर्गत रुग्णालयात आज बुधवारी दुपारनंतर पाच वाजता हाती आलेल्या अहवालानुसार सात जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. यात पाच पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे. पुरुषांची वयं ११,१९,१७,३०,३७ अशी असून महिलांची वयं २५ व २७ वर्षे अशी आहेत. हे सर्व वाकड, आनंदनगर, रावेत, रहाटणी, चिखली येथील रहिवाशी आहेत. तसेच पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील बोपोडी व साताऱ्यातील ३६ व ३१ वर्षीय पुरुषांना देखील कोरोनाची बाधा झालेली आहे.
दरम्यान आज तळवडे, मोशी, जुनी सांगवी, खराळवाडीतील सात जणांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या १३८ वर पोहोचली असून, पिंपरी चिंचवड शहरातील आजपर्यंत सकारात्मक रुग्णांची संख्या २४० वर पोहोचली आहे. आजपावतो महापालिकेच्या रुग्णालयात उपचारासाठी ८४ रुग्ण दाखल आहेत.
तसेच पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील एका पोलीस निरीक्षकासह चार पोलीस कर्मचा-यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे आजपर्यंत पोलीस आयुक्तालयातील सात जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे.