- अनधिकृतपणे फळभाजी विकणाऱ्या व्यवसायिकांसाठी महापालिकेने दंड रकमेत केला बदल….
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० मे २०२०) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत विविध कामासाठी येणाऱ्या २९ कोटी इतक्या खर्चास मंजूरी देण्यात आली. आज झालेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी संतोष आण्णा लोंढे होते.
फ क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत कृष्णानगर व इतर ठिकाणी व्हाल्व्ह ऑपरेशनकरिता मजूर कर्मचारी पुरविणेकरिता येणा-या र. रु. ४६ लाख ४८ हजार इतक्या खर्चास मंजूरी देण्यात आली. आरोग्य विभागामार्फत महापालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालयाच्या क्षेत्रातील रस्ते गटर्स साफसफाई करणेकमी सहा महीने कलावधीसाठी मुदतवाढ देण्यास मंजूरी देण्यात आली असून त्यासाठी येणा-या १७ कोटी ५० लाख या विषयासह इतर एकूण २९ कोटी रुपयांच्या खर्चास मंजूरी देण्यात आली.
महानगरपालिका हद्दीमध्ये हातगाड्या, टपऱ्या व थ्रीव्हिलर, फोर व्हिलर मधून काही व्यावसायिक फळे, भाजीपाला इ. चा व्यवसाय करतात. सदरच्या अनधिकृत व्यावसायिकांमुळे वाहतुकीची कोंडी व शहराचे विद्रुपीकरण होते. अशा अनधिकृत व्यवसायास लगाम घालणेकामी दंडात्मक कारवाई करण्यात येते. सदरची दंडाची रक्कम हातगाडीसाठी ३००० /-, टपरीसाठी ६००० / -, थ्री व्हिलर साठी १५००० / – वजनकाट्यासाठी १००० / – एवढी ठेवण्यात आली आहे.
शहरातील कोरोना विषाणू प्रादुर्भाव टाळण्यासाठी महापालिकेने शहरातील फळे, भाजीपाला व्यावसायिकाना मैदानाची जागा उपलब्ध करून देऊन सोशल डिस्टन्स पाळून व्यवसाय करण्याचे आदेश देण्यात आले होते. तथापी काही व्यावसायिक सदरची ठरवून दिलेली जागा सोडून अन्य ठिकाणी व्यवसाय करत असल्याचे आढळून आल्याने अतिक्रमण विभागामार्फत जप्तीची कारवाई करण्यात आली. कोविड – १९ कोरोना लॉकडाऊनध्या काळात अतिक्रमण विभागामार्फत करण्यात आलेल्या कारवाईमध्ये उचलण्यात आलेल्या गाड्यांमुळे त्यांचे उपजीविकेचे साधन बंद झालेले आहे. अशा परिस्थितीत मानवतेच्या हष्ट्रीकोनातून त्यांचे उपजीविकेचे साधन बंद करणे योग्य होणार नाही. त्यामुळे मानवतेच्या स्ट्रीकोनातून खालीलप्रमाणे अल्प दंड आकारून सदर गाड्या सोडणेस आज दि. २० / ०५ / २०२० च्या स्थायी समिती सभेमध्ये मान्यता देण्यात आली आहे.
हातगाडी दंड र. रू. – १००० /-
थ्री व्हिलर टेम्पो दंड र.रू. – २००० /-
चारचाकी वाहन दंड र. रु. – ३००० /-
हे सदरचे हे दंड आकारणीचे दर दि. ३१/०५/२०२० पर्यंतच लागू करणेस मान्यता देण्यात आली आहे.