- वाल्हेकरवाडी, रावेत, रहाटणीतील परिसर आज मध्यरात्रीपासून सील…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० मे २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात आज बुधवारी सायंकाळच्या सत्रात एकालाही कोरोनाची बाधा झालेली नाही. मात्र, खराळवाडीतील एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या १३८ वर पोहोचली असून, पिंपरी चिंचवड शहरातील आजपर्यंत सकारात्मक रुग्णांची संख्या २४० वर पोहोचली आहे. आजपावतो महापालिकेच्या रुग्णालयात उपचारासाठी ८४ रुग्ण दाखल आहेत.
तसेच आज रावेतमधील आकाशराज हौसिंग सोसायटी, वास्तु इंपेरियल समोर – औंध-रावेत बीआरटी रोड – श्री गणेश एंटरप्राईज कंपनी लि. – वस्तू रिव्हर नेस्ट समोर – वास्तु इंपेरियल समोरील परिसर.
रहाटणीतील श्रीकृष्ण कॉलनी, हरिकृपा दुध डेअरी – काळेवाडी रहाटणी रोड – श्रेया मेडिकल – दत्त मंदिर – गुरुकृपा ट्रेडिग – हरिकृपा दुध डेअरी परिसर.
वाल्हेकरवाडी येथील इंपेरियल हाईट्स समोर – एचडीएफसी बैंक एटीएम – महालक्ष्मी मेडिकल – जिजामाता चौक – स्वरा मेडिकल – रेनुका अपार्टमेंट – सिल्वर अक्षय सोसायटी समोर – डी.वाय.पाटील कोलेज मागील बाजू – इम्पेरियल हाईटस समोरील परिसर.
आज मध्यरात्री ११.०० वाजल्यापासून कन्टेनमेंट झोन घोषीत करुन पुढील आदेशापर्यंत सील करण्यात आलेला आहे. सदर हद्दीमध्ये पुढील आदेशापर्यंत प्रवेशबंदी व परिसरातून बाहेर पडण्याम नागरिकाना बंदी केलेली आहे. सील केलेल्या परिसरातील प्रत्येक नागरिकाने तोंडाला मास्क लावणे बंधनकारक आहे