न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ मे २०२०) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न दिवंगत राजीव गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या प्रतिमेस महापौर उषा ऊर्फ माई ढोरे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
आज सकाळी महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत झालेल्या या कार्यक्रमास पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, अ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, समाज विकास अधिकारी संभाजी ऐवले आदी उपस्थित होते.
तदनंतर माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक यांनी दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनानिमित्त पदाधिकारी, अधिकारी व कर्मचा-यांना दहशतवाद व हिंसाचार विरोधी शपथ दिली.















