- मोशी, चिखली व जुनी सांगवीतील तीनजण कोरोनामुक्त
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ मे २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात आज गुरुवारी सकाळी हाती आलेल्या अहवालानुसार पाच जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यात तीन पुरुषांचा आणि एका ६५ वर्षीय वृद्धासह २९ वर्षीय तरुणीचा समावेश आहे.
मुंबईतील एका ३२ वर्षीय पुरुषाला देखील कोरोनाची लागण झालेली आहे. पुरुषांचे वयं अनुक्रमे २५,३२,३५ अशी आहेत. हे रुग्ण पिंपरी, पिंपळे सौदागर, दिघी वाल्हेकरवाडी परिसरातील रहिवाशी आहेत.
दरम्यान शहरात सकारात्मक कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २४५ वर पोहोचली असून, मनपाच्या रुग्णालयात ८० रुग्ण उपचार घेत असून, शहरातील सात जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. तसेच आज मोशी, चिखली व जुनी सांगवीतील तीनजण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे आजपर्यंत शहरातील १४२ जन कोरोनामुक्त झाल्याचे या अहवालात म्हटले आहे.















