न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ मे २०२०) :- मनोज हे ते राहत असलेल्या सोसायटीच्या गेटजवळ सॅनिटायजेशनचे काम करीत होते. त्यावेळी आरोपी याने त्याच्याकडील चारचाकी वाहन भरधाव चालवून मनोज यांना पाठीमागून जोरदार धडक दिली. डोकं व मानेला मार लागू ते गंभीर जखमी झाले. यात त्यांचा मृत्यू झाला. रावेत येथे गुरुवारी (दि. २१) रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास हा अपघात झाला.
मनोज सर्जेराव कांबळे (वय ४४) असे मयताचे नाव आहे. तर त्यांची पत्नी रुपाली मनोज कांबळे (वय ४२, रा. सिल्वर पाम सोसायटी, रावेत) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अशोक भिकाजी तळेकर (वय ६२, रा. सिल्वर पाम सोसायटी, रावेत) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत .















