न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ मे २०२०) :- करोना साथीमुळे महानगरपालिकेच्या आर्थिक परिस्थितीवर गंभीर परिणाम झालेले आहेत. या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी लोकप्रतिनिधींचे अभिप्राय घेणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी फक्त आर्थिक संकटाच्या मुद्यावर कायदेशीररित्या नियोजनबद्ध महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा घेणे अत्यंत महत्वाचे आहे. ही सर्वसाधारण सभा व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे घ्यावी अशी मागणी जेष्ठ स्वीकृत नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांनी महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
भोईर यांनी पत्रात म्हटले आहे की, करोना साथीच्या प्रादुर्भावामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्र दोन महिन्यांच्या कालावधी पेक्ष्या जास्त काळ बंद आहे. राज्यात साथरोग प्रतिबंधक कायदा लागू झाल्यामुळे जवळ जवळ सर्व अधिकार पुणे जिल्हा कलेक्टर आणि महानगरपालिका आयुक्तांकडे गेलेले आहेत. प्रशासनाकडून करोना साथीसंदर्भात घेतले जाणाऱ्या निर्णयांची काटेकोर अंमलबजावणी केली जात असल्यामुळे, आणि शहरातील डॉक्टर, नर्सेस, इतर आरोग्यसेवक, पोलीस प्रशासन यांच्या प्रशंसनीय कार्यामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात करोना साथीचा प्रादुर्भाव आटोक्यात येतानाचे अहोरात्र प्रयत्न करत आहे.
माननीय महापौर आपल्या महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी उलटून गेला तरी अद्याप झालेली नाही. यामुळे कायदेशीर पेच निर्माण झाला आहे. याचबरोबर गेल्या दोन महिन्यांपासून महानगरपालिका क्षेत्र जवळ जवळ संपूर्णपणे बंद असल्यामुळे, मोठे आर्थिक संकट निर्माण झाले आहे. कोणत्याही प्रकारची आर्थिक देवाणघेवाण चालू नसल्यामुळे पालिका क्षेत्रातील संपूर्ण जनता आर्थिक विवंचनेत सापडली आहे. नागरिक महानगरपालिकेच्या करसंकलनात सूट मिळावी म्हणून मागणी करत आहेत.
करोना साथीमुळे महानगरपालिकेच्या आर्थिक परिस्थितीवर गंभीर परिणाम झालेले आहेत. या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी लोकप्रतिनिधींचे अभिप्राय घेणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी फक्त आर्थिक संकटाच्या मुद्यावर कायदेशीररित्या नियोजनबद्ध महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा घेणे अत्यंत महत्वाचे आहे. करोना साथीच्या काळात सामाजिक अंतर राखणे महत्वाचे असल्यामुळे सर्वसाधारण सभा विडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून घेतली जाऊ शकते. त्यातही तांत्रिक कारणांमुळे काही अडथळे निर्माण होत असल्यास, आपण शहरातील प्रमुख लोकप्रतिनिधींची बैठक बोलवावी. यामुळे सध्या लागू असेलेल्या साथरोग प्रतिबंधक कायद्याचे काटेकोरपणे पालन होईल आणि महानगरपालिकेला येऊ घातलेलेल्या आर्थिक संकटातून बाहेर पडण्यास मदत होईल, महापौर म्हणून तुम्ही शहराच्या प्रथम नागरिक आहात. शहर आर्थिक संकटात सापडू नये, यासाठी महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा व्हीडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून किंवा शहरातील प्रमुख लोकप्रतिनिधींची बैठक घेऊन महापालिकेची लवकरात लवकरआर्थिक संकटातून मुक्तता करावी, असे या पत्रात नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांनी म्हटले आहे.















