- शहरातील २९ पुरुष व १७ महिला अशा एकूण ४६ जणांना कोरोनाची लागण…
- इंदिरानगर, आकुर्डी, च-होली व थेरगावातील नऊजण कोरोनामुक्त…
- पिंपरी कॉलनी, वाकड, वडमुखवाडीतील परिसर मध्यरात्रीपासून सील…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ मे २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात आज शनिवारी कोरोनाने जोरदार मुसंडी मारली असून, आज रात्री आठ वाजता हाती आलेल्या अहवालानुसार शहरातील २९ पुरुष व १७ महिला असे एकूण ४६ जणांना कोरोनाची लागण झालेली आहे. यात वायसीएममधील एका ३० वर्षीय डॉक्टरचा देखील समावेश आहे. तसेच पुण्यातील भवानी पेठ, नाना पेठ, येरवडा व खडकीतील एक पुरुष व तीन महिलांना देखील कोरोनाने पछाडलेले आहे.
दरम्यान आज चाचणी अहवाल सकारात्मक (पॉझिटीव्ह) आलेले रुग्ण चिंचवड स्टेशन, पिंपरी, वाकड, भोसरी, वडमुखवाडी, वाकड परिसरातील रहिवाशी आहेत. त्यामुळे शहरातील सक्रीय कोरोनाग्रस्तांची संख्या ३११ वर पोहोचली असून, महापालिकेच्या रुग्णालयात १११ रुग्ण उपचारासाठी दाखल आहेत. शहरातील एकूण सात जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे.
आज इंदिरानगर चिंचवड, आकुर्डी, च-होली व थेरगाव येथील नऊ कोरोनाबाधित रुग्णांचे दोन्ही वेळचे चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्याने त्या रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
तसेच पिंपरीमधील पिंपरी कॉलनी परिसरातील-साई चौक-आय.सी.आय.सी.आय. बँक एटीएम – डेरा संत बाबा हरियासिंग दरबार-शाम सुंदर सुपर मार्केट – श्री मुद्रा गणेश मंदिर – गे लॉर्ड चौक – महादेव पॅटीस वाला – साई चौक.
वाकडमधील पोलिस लाईन परिसरातील सिसिम स्ट्रीट स्कुल – श्री रामपाली सिपाही महाराज रोड – श्री गणेश सुपर मार्केट – आय.सी.आय.सी.आय. बँक एटीएम – सिसिम स्ट्रीट स्कुल.
वडमुखवाडीतील अलंकापुरम सोसायटी परिसरातील पीएस रेसिडन्सी – देविका स्टेशनरी – अलंकापुरम रोड – पदमावती दुध डेअरी – पी.एस. रेसिडन्सी.
हा परिसर आज मध्यरात्री ११.०० वाजल्यापासून पुढील आदेशापर्यंत सील करण्यात येत आहे. सदर परिसराच्या हद्दीमध्ये पुढील आदेशापर्यंत प्रवेशबंदी व परिसरातुन बाहेर पडण्यास नागरिकांना बंदी केलेली आहे. सील केलेल्या परिसरातील प्रत्येक नागरिकाने तोंडाला मास्क लावणे बंधनकारक आहे.















