- आज खराळवाडीतील एकजण कोरोनामुक्त..
- डांगे चौक, भोसरीतील परिसर मध्यरात्रीपासून सील..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ मे २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाने तुफान थैमान माजविले असून आज रविवारी सकाळ व दुपारच्या सत्रात ४२ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. यात ३१ पुरुषांचा व ११ महिलांचा समावेश आहे. तसेच पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील पुणे जिल्ह्यातील जुन्नर, वारजे, देहूरोड, आंबेगावमधील पाच पुरुषांना व दोन महिलांनादेखील कोरोनाची बाधा झालेली आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील आज चाचणी अहवाल सकारात्मक (पॉझिटीव्ह) आलेले रुग्ण आनंदनगर चिंचवड, भोसरी, सांगवी, थेरगांव येथील रहिवासी आहेत. त्यामुळे शहरातील सक्रीय कोरोनाग्रस्तांची संख्या ३५४ वर पोहोचली असून, महापालिकेच्या रुग्णालयात १५५ रुग्ण उपचारासाठी दाखल आहेत. शहरातील एकूण सात जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे.
तसेच आज खराळवाडी येथील रहिवासी असलेला एक कोविड १९ बाधित रुग्णाला दोन्ही चाचण्या निगेटिव्ह आल्याने रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आजपर्यंत कोरोनामुक्त रुग्णांची संख्या १७० वर पोहोचली आहे.
आज वाकडमधील डांगे चौक परिसरातील पंडित शोरुम – ओरिएंटल किचन हॉटेल – डांगे चौक रोड – प्रतिभा मोटर्स – पंडित शोरुम परिसर.
भोसरीतील शास्री चौक परिसरातील बंधन बैंक – अजय डिस्ट्रिब्युटर्म – हॉटेल शांघाई – एच.डी.एफ.सी बँक एटीएम – श्रेयस मेडिकल – बंधन बैंक परिसर.
आज मध्यरात्री ११.०० वाजलेपासून पुढील आदेशापर्यंत सील करण्यात येत आहे. सदर परिसराच्या हद्दीमध्ये पुढील आदेशापर्यंत प्रवेशबंदी व परिसरातून बाहेर पडण्यास नागरिकांना बंदी केलेली आहे. सील केलेल्या परिसरातील प्रत्येक नागरिकाने तोंडाला मास्क लावणे बंधनकारक आहे.













