न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ मे २०२०) :- खोकताना किंवा शिंकताना तोंडाला हात लावावा, सार्वजनिक ठिकाणी आणि रस्त्यांवर थुंकू नये. पिंपरी चिंचवड महापालिकेनं अशा नागरिकांना दंडही ठोठावला आहे.
आज दुपारी चार वाजण्याच्या सुमारास गुन्हे पोलीस निरीक्षक राजेंद्र निकाळजे हे मोटारीने जात असताना त्यांना पिंपरीतील मोरवाडी चौकात एक नागरिक रस्त्यावर थुंकताना दिसला. तेव्हा, निकाळजे यांनी वाहन चालकाला मोटार थांबवायला सांगत, त्या नागरिकाला बोलावून घेतलं. या नागरिकाला निकाळजे यांनी रस्त्यावर थुंकण्याचे दुष्परिणाम सांगत चांगलेच सुनावले.
तसेच त्याच्याच रुमालाने रस्त्यावरील त्याची थुंकी साफही करायला लावली. याचा व्हिडिओ सध्या व्हाट्सअॅपवर व्हायरल झाला आहे. नागरिकांनी सार्वजनिक रस्त्यांवर थुंकू नये, असं आवाहन ही निकाळजे यांनी केलं आहे.













