न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ मे २०२०) :- चिखलीतील घरकुल येथील एका किराणा दुकानासमोर काहीजण सिगारेट ओढत होते. त्यामुळे दुकानदाराने त्यांना बाजूला जाण्यास सांगितले. यावरून सिगरेट ओढणारे तरुण त्या दुकानदाराशी वाद घालू लागले.
त्या वेळी तेथून जाणाऱ्या एका होमगार्डने त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी होमगार्डशी वाद घतला व अंगावर धावून आले. त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. मारहाण करणाऱ्यांपैकी काही तरुणांनी मद्यपान केलं होतं, असं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. याप्रकरणी सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, आरोपी फरार झाले आहेत.













