न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ मे २०२०) :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रूपीनगर प्रभाग क्रमांक १२ मधील नागरिकांना रोग प्रतिकारशक्ती वाढविणाऱ्या अर्सेनिक अल्बम ३० या गोळ्यांचे वाटप करण्यात आले.
डॉक्टर पांडुरंग काळे यांच्या सल्ल्याने व सहकार्याने रूपीनगर येथील श्रीकृष्ण मंदिर येथे निवृत्त कॅप्टन उत्तेकर, माजी सैनिक सोनगीरे, चेअरमन हनुमंत जाधव, सामाजिक कार्यकर्ते शरद तात्या भालेकर, रवि शेतसंधी व सर्व सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक मित्रांच्या मदतीने या गोळ्या वाटपास सुरुवात करण्यात आली आहे. गोळ्यांचे संपूर्ण प्रभागात वाटप करण्यात येणार आहे.
यावेळी मनसेचे उपशहराध्यक्ष विशाल मानकरी, शहर सचिव राहुल जाधव, शहर संघटक सुशांत साळवी, सचिन मिरपगार, अजित जाधव, अजय गायकवाड आदी उपस्थित होते.













