न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ मे. २०२०) :- पिंपरी चिंचवड महापालिकेतील ‘अ’, ‘ब’ श्रेणीतील अधिका-यांचे दोन दिवसाचे आणि ‘क’, ‘ड’ श्रेणीतील अधिका-यांचे एक दिवसाचे वेतन कपात करण्यास सरकारने कळविले आहे.
मूळवेतन-ग्रेड वेतन-महागाई भत्ता यांच्या एकूण रकमेच्या आधारे गणना करुन कपात करण्यात यावी. महापालिकेतील सात हजार ६०० कर्मचा-यांचे मानधन कपात होणार आहे. याची अंदाजे रक्कम दीड कोटी रुपये होत आहे. कपात झालेल्या एक, दोन दिवसाच्या वेतनाची रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देण्याची व्यवस्था लेखा विभागामार्फत करण्याचे आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले आहे.


















