न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ मे. २०२०) :- ताथवडे येथे मंगळवारी (दि.२६) रोजी पहाटे अडीचच्या सुमारास ताथवडे गावच्या हद्दीत, पवारवस्ती येथे घरासमोर उभ्या केलेल्या वाहनांना अज्ञात कारणाने आग लागली. आगीत तिन चारचाकी आणि सात दुचाकींचे जळून प्रचंड नुकसान झाले.
आग लागल्याची माहिती मिळताच हिंजवडी एमआयडीसी विभागातील अग्निशमन दलाच्या दोन गाझ्या तत्काळ घटना स्थळी दाखल झाल्या. काही वेळातच आग आटोक्यात आणली. मात्र, तो पर्यंत वाहनांचे प्रचंड नुकसान झाले होते.
आग नक्की कशामुळे लागली समजू शकले नाही. मात्र पहाटेच्या सुमारास अचानक घडलेल्या जळीतकांडामुळे ताथवडे परिसरात घबराट पसरली आहे. याप्रकरणी अजित तुकाराम पवार (वय ३२, पवार वस्ती, ताथवडे) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.














