- च-होलीतील तिघे कोरोनामुक्त…
- चिंचवड स्टेशन, काळेवाडीतील परिसर मध्यरात्रीपासून सील…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ मे. २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात आज मंगळवारी सायंकाळी आलेल्या अहवालानुसार ३४ जणांना कोरोनाची लागण झालेली आहे. यात पंधरा पुरुष व एकोणीस महिलांचा समावेश आहे. तसेच आज पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील आंबेगावमधील दोन पुरुषांना कोरोनाची लागण झालेली आहे.
दरम्यान आज अहवाल सकारात्मक (पॉझिटीव्ह) आलेले रुग्ण रुपीनगर, आनंदनगर चिंचवड, वाकड, पिंपरी, भोसरी, कासारवाडी, वाल्हेकरवाडी, भाटनगर येथील रहिवासी आहेत.
त्यामुळे शहरातील सकारात्मक कोरोना रुग्णांची संख्या ४२४ वर पोहोचली आहे. महापालिकेच्या रुग्णालयात २२० रुग्ण उपचार घेत असून, आजपर्यंत ७ जणांचा मृत्यू झालेला आहे. तर, शहरातील १७० रुग्ण कोरोनामुक्त झालेले आहेत.
तसेच आज च-होलीतील तीन कोविड १९ बाधित रुग्णांची निगेटिव्ह चाचणी आल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे शहरातील १७३ रुग्ण कोरोनामुक्त झालेले आहेत.
आज चिंचवड स्टेशन परिसरातील प्रेस्टिज बिल्डिंग-काकडे रेसिडेन्सी – परफेक्ट वॉर सर्व्हिसेस – मुंबई – पुणे हायवे – मॉडर्न सायकल कंपनी – काकडे रेसिडन्सी.
काळेवाडीतील पवनानगर लेन नं .४ – पवनानगर लेन नं .१-पवनानगर लेन नं .१ – पवनानगर लेन नं .४ – कोकणरत्न मित्र मंडळ – निकिता जनरल स्टोअर – पवनानगर लेन नं. ४.
हा परिसर आज मध्यरात्री ११.०० वाजलेपासून पुढील आदेशापर्यंत सील करण्यात येत आहे. सदर परिसराच्या हद्दीमध्ये पुढील आदेशापर्यंत प्रवेशबंदी व परिसरातून बाहेर पडण्यास नागरिकांना बंदी केलेली आहे. सील केलेल्या परिसरातील प्रत्येक नागरिकाने तोंडाला मास्क लावणे बंधनकारक आहे.


















