न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ मे. २०२०) :- पिंपरी कॅम्प परिसरात एका टेम्पोत मोबाईल येणार असून त्यामध्ये काहीतरी गडबड असल्याची खबर पोलिसांना मिळाली. त्यानुसार त्यांनी सापळा रचून संशयित टेम्पो ताब्यात घेतला. टेम्पोचालकाने हे मोबाईल कॅम्प परिसरातील एका व्यावसायिकाचे असल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी संबंधित व्यावसायिकास संपर्क करून मोबाईलच्या खरेदी बिलांची मागणी केली.
चौकशीअंती टेम्पोत मिळालेले मोबाईल आणि खरेदी बिले यामध्ये विसंगती असल्याचे समोर आले. तसेच तो टेम्पो सोडून द्यावा, यासाठी पोलिसांवर मोठ्या प्रमाणात राजकीय दबाव आणला. मात्र प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी घटनास्थळी हजर असल्याचे पोलिसांनी, अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितले. शेवटी पोलिसांनी जीएसटी आणि आयकर विभागांच्या अधिकाऱ्यांना याबाबत माहिती देत हे प्रकरण त्यांच्या स्वाधीन केले. हा प्रकार रविवारी ( दि . २४ ) दुपारी पिंपरीतील साई चौकात घडला.














