न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ मे. २०२०) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेत आता १०० टक्के अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत महापालिकेचे कामकाज सुरु करण्यात आले आहे. महापालिकेच्या सर्व कार्यालयांमध्ये नागरिकांना दुपारी २ ते सायंकाळी ६ या वेळेतच प्रवेश दिला जाणार आहे.
अत्यावश्क सेवा, शिफ्ट ड्युटीमधील कर्मचाऱ्यांच्या कामकाजाच्या वेळेत कोणताही बदल केला जाणार नाही. ज्या कर्मचाऱ्यांकडे नागरिकांचे संबंधित कामकाज आहे अशा कर्मचाऱ्यांनी वेळेवर कामावर उपस्थित राहणे बंधनकारक आहे. महिला कर्मचाऱ्यांची सायंकाळी ६.१५ नंतर कार्यालयीन वेळ संपुष्टात येईल. मनपा कर्मचाऱ्यांनी सुरक्षित अंतराच्या नियमांचे पालन करावे, असे आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले आहेत.