न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ मे. २०२०) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी टेस्टिंग बस वापरण्यास मान्यता देण्यात आली असून, बसमध्ये रक्त नमुने घेणे, स्क्रिनिंग करणे इत्यादी सुविधा असून त्याचा उपयोग रुग्णांचा जादा प्रादुर्भाव असणारे क्षेत्रात रुग्ण, स्व्याब नमुने घेणे यासह तातडीने तपासणी करणे सोयिस्कर होणार आहे.
त्यासाठी येणाऱ्या १ कोटी रुपयांच्या खर्चास मंजूरी देण्यात आली. त्यासह विविध कामांसाठी येणाऱ्या र. रु. ८ कोटी ६० लाख इतक्या खर्चास मंजूरी देण्यात आली. आज झालेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी संतोष लोंढे होते.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना म्हणून भोसरी रुग्णालय येथे १० बेडचे वायसीएम येथे १५ बेडचे आयसीयू यूनिट तातडीने तयार करणेकामी व त्यासाही आवश्यक उपकरणे खरेदी करण्यासाठी येणाऱ्या १ कोटी ७१ लाख इतक्या खर्चास मंजूरी देण्यात आली.
ह क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत कासारवाडी उपविभागातील नव्याने विकसित होणाऱ्या रस्त्यांवर दिवाबत्तीची सोय व अनुषंगिक कामे करण्यासाठी येणाऱ्या २६ लाख रुपयांच्या खर्चास मंजूरी देण्यात आली.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना म्हणून आपत्कालीन परिस्थितीसाठी उपाययोजना म्हणून रुबी अलकेयर सर्व्हिसेस प्रा.लि. यांचेकडून त्यांच्या सर्व डॉक्टर्स व स्टाफ सह सेवा वापरणेसाठी प्रतिमहा र.रु. ५२ लाख ६२ हजार रुपयांच्या खर्चास मंजूरी देण्यात आली.
पीएमपीएमएलचे निगडी येथील बस डेपो येथील चार्जिंग पॉइंट व इतर अनुषंगिक कामासाठी येणाऱ्या २६ लाख ७८ हजार इतक्या वाढीव खर्चास मान्यता देण्यात आली.











