- किवळे, संभाजीनगर, रुपीनगर, आनंदनगर, रहाटणी, चिखलीतील २१ रुग्ण कोरोनामुक्त…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ मे. २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात आज नव्याने २२ जणांना कोरोनाची लागण झालेली आहे. यात १२ पुरुष व १० महिलांचा समावेश आहे. तसेच पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील बोपखेल व आंबेगाव परिसरातील चार पुरुषांना कोरोनाची बाधा झालेली आहे.
आज चाचणी अहवाल सकारात्मक (पॉझिटीव्ह) आलेले रुग्ण च-होली, भाटनगर, किवळे, निगडी, पिंपळे गुरव, सांगवी, आनंदनगर, बौध्दनगर, काळेवाडी फाटा येथील रहिवासी आहेत. दरम्यान पिंपरी चिंचवड शहरात ४४६ रुग्ण कोरोनाने बाधित असून, महापालिकेच्या रुग्णालयात २२० रुग्ण उपचारासाठी दाखल आहेत. आजपर्यंत शहरातील सात जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे.
शहरातील किवळे, संभाजीनगर, रुपीनगर, आनंदनगर, रहाटणी, चिखली, कसबापेठ, बोपोडी येथील २१ कोविड बाधित रुग्णांना आज रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आजपर्यंत शहरातील १९१ रुग्ण कोरोनामुक्त झालेले आहेत.