न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ मे. २०२०) :- वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार तसेच टोळी प्रमुख अनिकेत अर्जुन चौधरी (रा. प्रेरणा शाळेजवळ, लक्ष्मणनगर, थेरगाव), धीरज श्रीकांत शिंदे (वय २२, रा. जीवननगर, ताथवडे), अजय सुधाकर शिरसाठ (वय २२, रा. जीवननगर, ताथवडे), मयूर शिवाजी भोसले (वय २३, रा. जीवननगर, ताथवडे), समीर बोरकर, अशी मोक्काची कारवाई करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार तसेच टोळीप्रमुख अविनाश बाळू धनवे (वय २९, रा. वडमुखवाडी, च-होली), ऋषिकेश हनुमंत गडकर (वय २३ रा. काळे कॉलनी, देहूफाटा) जगदीश संजय काकडे (वय २० रा. इंद्रायणी पार्क, पद्मावती रोड, स्वातीकृपा मंगल कार्यालया शेजारी, आळंदी) अशी मोक्काची कारवाई झालेल्या आरोपींची नावे आहेत.
आरोपींनी वर्चस्व आणि आर्थिक फायद्यासाठी टोळी बनवून संघटितपणे गुन्हे करीत असल्याने त्यांच्यावर पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाने बुधवारी (दि. २७) मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे.