- पुण्यातील एकाचा उपचारादरम्यान मृत्यू..
- आनंदनगरमधील सात कोविड बाधित रुग्ण कोरोनामुक्त…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ मे. २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात आज गुरुवारी सायंकाळी आलेल्या अहवालानुसार १३ जणांना कोरोनाची लागण झालेली आहे. यात ७ पुरुष व ६ महिलांचा समावेश आहे. तसेच पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील तीन पुरुषांनादेखील कोरोनाची बाधा झालेली आहे. तर पुण्यातील गोखलेनगर परिसरातील एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे.
आज चाचणी अहवाल सकारात्मक (पॉझिटीव्ह) आलेले रुग्ण आनंदनगर, बौध्दनगर, थेरगांव, बजाज ऑटो कॉलनी किवळे येथील रहिवासी आहेत. दरम्यान पिंपरी चिंचवड शहरात ४५९ रुग्ण कोरोनाने बाधित असून, महापालिकेच्या रुग्णालयात २२७ रुग्ण उपचारासाठी दाखल आहेत. आजपर्यंत शहरातील सात जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे.
शहरातील आनंदनगर येथील सात कोविड बाधित रुग्णांना आज रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आजपर्यंत शहरातील १९७ रुग्ण कोरोनामुक्त झालेले आहेत.