न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ मे. २०२०) :- लॉकडाऊन काळात सर्वसामान्य, कष्टकरी, दिव्यांग, निराधार, गरजू लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून उपमहापौर तुषार हिंगे पहिल्या दिवसांपासून कार्यरत आहेत. शाहूनगर, संभाजीनगर, मोरवाडी प्रभाग क्रमांक दहामधील गरजू नागरिकांना धान्य, भाजीपाला, भोजन तसेच, औषध वितरणासह औषध फवारणी, सॅनिटायझर टनेल उभारणी, तात्पुरता भाजीपाला विक्री केंद्र, मास्क व सॅनिटायझर वितरीत करण्यात पुढाकार घेतला आहे.
प्रभागातील १०० गरजू कुटुंबाना किराणा व अत्यावश्यक साहित्याचे किट देण्यात आले. ‘विटॉमीन सी’ या कॅल्शियम वाढीच्या होमिओपॅथी औषधाचे प्रभागातील तब्बल ७ हजार ५०० कुटुंबांना मोफत वितरण करण्यात आले. प्रभागातील गरजू, कष्टकरी, दिव्यांग, ज्येष्ठ आणि निराधार असा एकूण २ हजार लोकांना दररोज भोजन वितरण सुरू आहे.
उपमहापौर हिंगे यांनी स्वत:चे थरमॅक्स चौक, चिंचवड येथील पंजाब रसोई हॉटेल पोलिसांना विश्रांतीसाठी मोफत उपलब्ध करून दिले आहे. त्याचा लाभ असंख्य पोलिस अधिकारी व कर्मचारी घेत आहेत. त्यांच्या या सक्रिय पुढाकाराबद्दल प्रभागातील नागरिक कौतुक करीत आहेत.