न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ मे २०२०) :- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देशभरातील लॉकडाउनसंबंधी अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचं मत जाणून घेतलं. पीटीआयने यासंबंधी वृत्त दिलं आहे. पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, अमित शाह यांनी लॉकडाउन पुढे वाढवण्यासंबंधी मुख्यमंत्र्यांचं काय मत आहे हे जाणून घेण्यासाठी फोनवरुन त्यांच्याशी चर्चा केली.
मुख्यमंत्र्यांशी बोलताना अमित शाह यांनी राज्यांमध्ये चिंता वाटणारी ठिकाणे तसंच १ जूनपासून सुरु केली जाऊ शकतात अशी कोणती क्षेत्रं आहेत यासंबंधी माहिती जाणून घेतली असं अधिकाऱ्याने सांगितलं आहे. बैठकीतील सविस्तर माहिती अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. पण मिळालेल्या माहितीनुसार, अनेकांनी सर्वसामान्य जीवन सुरळीत व्हावं तसंच अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी काही निर्बंध शिथील करत लॉकडाउन सुरु ठेवावा असं मत व्यक्त केल्याचं अधिकाऱ्याने सांगितलं आहे.