- नऊ कोरोनाबाधित गर्भवती महिलांवर केले यशस्वी उपचार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ मे २०२०) :- ११ मार्च २०२० रोजी पहिल्या करोना रुग्णांची पिंपरी चिंचवड शहरात नोंद झाली. गेल्या पंच्याहत्तर दिवसात करोगाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असून गर्भवती महिलामध्ये देखील करोनाची लागण झाल्याचे निदर्शनास येत आहे. मनपाचे वाय. सी. एम. रूग्णालय हे समर्पित कोविड रूग्णालय घोषित करण्यात आले आहे. येथे गर्भवती महिलासहित सर्व करोना बाधित रुग्णांची उपचाराची व्यवस्था उपलब्ध आहे. या कालावधीत वाय. सी. एम. रूग्णालयामध्ये नउ गर्भवती महिलावर यशस्वी उपचार करण्यात आले नउ रूग्णांपैकी चार रुग्णांची प्रसुती सिझेरियन शस्त्रक्रियेद्वारे करण्यात आली.
या चार रूग्णांपैकी एका गर्भवती महिलेला उच्च रक्तदाबाचा त्रास असून जोखीम टाळण्यासाठी सिझरीन शस्त्रक्रिया करण्यात आली असून आई व बाळ दोन्ही सुरक्षित आहेत. तर दुस-या गर्भवती महिलेच्या बाबतीत नवव्या महिन्यामध्ये प्रसुती कळा चालू झाल्यानंतर पुर्वीचे सिझरीयनने टाके निखळून गर्भ पिशवी फाटली असल्यची लक्षणे दिसून आली. यामध्ये त्वरीत सिझरीयनचा निर्णय घेउन आई व बाळ दोघांचा जीव वाचवण्यात डॉक्टरांना यश आले. इतर रुग्णांपैकी दोन रुग्णाची डिलिव्हरी ही नजीकच्या रूग्णालयात झाल्यानंतर करोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने पुढील उपचाराकरीता वाय सी. एम. रूग्णालयात दाखल करण्यात आले व यशस्वी उपचार करून त्याना डिस्चार्ज करण्यात आले.
इतर तीन गर्भवती महिलापैकी प्रसुतीपुर्व कालावधीत गर्भावस्थेच्या तिस-या महिन्यांमध्ये दोन रुग्ण व पाचव्या महिन्यांमध्ये एक रूग्ण यांचा समावेश आहे. या तीन रूग्णापैकी दोन रूग्णांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आला व एका रुग्णांवर उपचार चालू असून सदर रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. प्रसुतीनंतर सर्व नवजात शिशुची करोगा तपासणी करण्यात आली असून त्याचा अहवाल निगेटिव आला आहे. वरील कालावधीत रुग्णाव्यतिरिक्त कोरोना सदृश्य लक्षणे असणाऱ्या १३० रुग्णांच्या प्रसुती करण्यात आल्या.
ठळक वैशिष्टये
१. करोना बाधित गर्भवती रुग्णांसाठी स्वतंत्र प्रसुतीका व स्वतंत्र शस्त्रक्रियागृह.
२. करोना बाधित अथवा करोनासदृश्य लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी २४ तास स्त्रीरोग तज्ञाची उपलब्धता.
३. करोना सदृश्य लक्षणे असताना व तपासणी अहवाल प्रतीक्षेत असताना पीपीई कीट चा वापर करून तातडीक उपचार (डिलिव्हरी अथवा सिझेरियन )
४. आयसीएमआर नियमावलीप्रमाणे सर्व रूग्णांवर उपचार.
५. प्रत्येक डिलिव्हरी दरम्यान नवजात शिशु / बालरोग तज्ञ यांची उपलब्धता.
६. गरज पडल्यास करोनाबाधित गर्भवती रूग्णांसाठी अतिदक्षता विभागाची सोय उपलब्ध.
वाय. सी. एम. रूग्णालय अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. महेश आसलकर (कोविड स्त्रीरोग विभाग), डॉ. हेमराज नारखेडे, डॉ. आनंद करळे, डॉ. स्मिता ठक्करवाड, डॉ. कुणाल शिंदे, डॉ. सुपे, डॉ. रेणू हे स्त्रीरोग तज्ञ कार्यरत आहेत.
वाय. सी. एम. रूग्णालय येथे वैद्यकीय पदव्युत्तर संस्था चालू झाल्यानंतर येथे वैद्यकीय शिक्षण घेणा-या निवासी डॉक्टराची करोना बाधित रूग्ण सेवेसाठी २४ तास उपलब्धता निर्माण झाली आहे. ही बाब कौतुकास्पद आहे. तसेच डॉ. अनिकेत लाठी, डॉ. प्रसाद भानप, बालरोग विभाग प्रमुख, मेडीसीन विभाग प्रमुख व भुलतज्ञ विभाग प्रमुख व स्त्री रोग विभागात कार्यरत असलेल्या सर्व परिचारीका, मेटन यांचे सहकार्य मोलाचे आहे.