- सांगवीतील एका वृद्धाचा कोरोनामुळे मृत्यू…
- शहरातील आनंदनगर, चिखली येथील १९ रुग्ण कोरोनामुक्त…
- अजंठानगर, नेहरुनगर, पिंपरीचा काही परिसर आज सील…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ मे २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात आज शुक्रवारी सायंकाळी आलेल्या अहवालानुसार ३८ जणांना कोरोनाची लागण झालेली आहे. यात १८ पुरुष व २० महिलांचा समावेश आहे. तसेच पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील जुन्नर, कसबापेठ, राजगुरुनगर, देहुरोड, औंध, खडकी, सोलापूर, आंबेगाव मधील दहा पुरुष व एका महिलेला कोरोनाची बाधा झालेली आहे. तर, शहरातील सांगवीमधील एका ७५ वर्षीय वृद्धाचा व जिल्ह्यातील जुन्नर परिसरातील एका व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे. त्यामुळे आजपर्यंत शहरातील आठ जण कोरोनामुळे मृत्यू पावले आहेत.
आज चाचणी अहवाल सकारात्मक (पॉझिटीव्ह) आलेले रुग्ण आनंदनगर, वाल्हेकरवाडी, रुपीनगर, बौध्दनगर, महात्मा फुलेनगर, भिमनगर, च-होली, सांगवी, नेहरुनगर, दापोडी, वाकड येथील रहिवासी आहेत. दरम्यान पिंपरी चिंचवड शहरात ४९७ रुग्ण कोरोनाने बाधित असून, महापालिकेच्या रुग्णालयात २४७ रुग्ण उपचारासाठी दाखल आहेत.
शहरातील आनंदनगर, चिखली येथील १९ रुग्णांना आज रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आजपर्यंत शहरातील २११ रुग्ण कोरोनामुक्त झालेले आहेत.
आज अजंठानगर येथील सिध्दार्थ बिल्डिंग-अमृतकृपा हौसिंग सोसायटी-ट्रान्सपोर्ट कॉर्पे ऑफ इंडिया-विनोद व्हरायटी-अमृतकृपा हौसिंग सोसायटी, कुलदिप आंगण.
नेहरुनगर येथील कुलदिप आंगण सोसायटी-तरटे किराणा दुकान – लक्ष्मी टेफ्लॉक्स – कुलदीप आंगण सोसायटी – अमिर चिकन सेंटर – तरटे किराणा दुकान.
पिंपरीतील सोनकर चेंबर्स, गरीब नवाब हॉटेल – गर्ग प्रोव्हिजन स्टोअर्स – नानल हॉस्पिटल – गरीब नवाब हॉटेल.
हा परिसर आज मध्यरात्री ११.०० वाजलेपासून पुढील आदेशापर्यंत सील करण्यात येणार आहे. परिसराच्या हद्दीमध्ये पुढील आदेशापर्यंत प्रवेशबंदी व परिसरातून बाहेर पडण्यास नागरिकांना बंदी केलेली आहे. सील केलेल्या परिसरातील प्रत्येक नागरिकाने तोडाला मास्क लावणे बंधनकारक आहे.