न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० मे. २०२०) :- कोरोना विषाणूच्या धर्तीवर राज्यभर रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे राज्य सरकारने रक्तदात्यांना रक्तदान करण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत भोसरी विधानसभा मतदारसंघातील कुदळवाडीत सोमवारी (दि. १ जून) रोजी स. १० ते सा. ५ या वेळेत महापालिकेच्या शाळेत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
रक्तदान शिबिराचे आयोजन आमदार श्री पै महेशदादा लांडगे युवा मंच, कुदळवाडी व भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने करण्यात आले आहे. दरम्यान परिसरातील नागरिकांना मास्क, सॅनिटायझर, होमिओपॅथी गोळ्यांचे मोफत वाटप करण्यात येणार आहे. सोशल डिस्टन्सिंगचे योग्य नियोजन करण्यात आले आहे. परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने या रक्तदान शिबिरात रक्तदान करावे, असे आवाहन ‘ फ ‘ प्रभागाचे स्वीकृत नगरसदस्य दिनेश यादव यांनी केले आहे.


















