न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० मे. २०२०) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवेमधील विविध पदावरील ९१ अधिकारी आणि कर्मचारी सेवानिवृत्त झाले. तसेच ३ कर्मचा-यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. सेवापुर्ती निमित्त या सर्वांचा सत्कार महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते करण्यात आला.
महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये झालेल्या या कार्यक्रमावेळी स्थायी समिती सभापती संतोष लोढे, नगरसेवक तुषार कामठे, सुलक्षणा धर, प्रज्ञा खानोलकर , अतिरिक्त आयुक्त अजित पवार , सहाय्यक आयुक्त चंद्रकांत इंदलकर , अण्णा बोदडे , कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे यांच्यासह विविध अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
सेवानिवृत्त झालेल्या कर्मचा-यांमध्ये लेखाधिकारी मोहन निकम, प्रशासन अधिकारी रामदास लोखंडे, मुख्याध्यापक जनार्दन साळुके, सुरेखा रोटे, अलका कांबळे, वैद्यकीय अधिकारी सविता पाटील, कार्यालयीन अधिक्षक विजय घावटे, विठ्ठल कावरे, मुख्य लिपिक अशोक लांडे, रमेश भोसले, शिवाजी खुडे, बाळासाहेब क्षीरसागर, नंदकुमार ताकवले, पांडुरंग गायकवाड, नारायण काकडे, दुरध्वनी चालक महेंद्र भिंगारदिवे, लिपिक माधव वाव्हळ, वाहन चालक बाबाजी खामकर, किसन गेंगजे, परशुराम इसवे, विलास सातपुते, विनायक साबळे, लेखापाल विलास कार्वे, सिस्टर इनचार्ज उषा कु-हाडे, स्टाफ नर्स शोभा धुंडरे, लॅब टेक्नीशियन उमा जाधव, ए एन एम नेहलता धुमाळ, मल्टीपर्पज वर्कर हसन मुल्ला, प्रयोगशाळा सहाय्यक जगन्नाथ लंबाते, कनिष्ठ अभियंता पोपट घावटे, चंद्रकांत घोरपडे, शेखर फंड, गिरिष आवटे आदींसह विविध पदावरील ९४ कर्मचा-यांचा समावेश होता.


















