न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० मे. २०२०) :- लॉकडाउन ५.० संदर्भात केंद्र सरकारकडून महत्वाची घोषणा करण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने लॉकडाउन संदर्भात नवीन मार्गदर्शकतत्वे जारी केली आहेत. लॉकडाउन आता फक्त कन्टेन्मेन्ट झोनपुरता मर्यादीत राहणार आहे. टप्याटप्याने सर्व आर्थिक व्यवहार सुरु होतील.
८ जूनपासून आणखी काही बाबी शिथिल करण्यात आल्या आहेत. ज्यानुसार धार्मिक स्थळे, मॉल्स, हॉटेल्स ८ जूनपासून उघडणार आहेत. मात्र सोशल डिस्टन्सिंग पाळणं अनिवार्य असणार आहे तसंच मास्क घालणंही अनिवार्य असणार आहे. असंही केंद्रीय गृहमंत्रालयाने स्पष्ट केलं आहे.
३० जून पर्यंत फक्त कन्टेन्मेन्ट झोनमध्ये लॉकडाउन कायम राहिल. कन्टेन्मेन्ट झोनमध्ये लॉकडाउन अधिक कठोर करण्यात आला आहे. फक्त अत्यावश्यक गोष्टींना परवानगी असेल. कंटेन्मेट झोनमध्ये ३० जूनपर्यंत लॉकडाउन असेल असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. रात्री ९ ते पहाटे ५ वाजेपर्यंत संचारबंदी कायम असणार आहे.
सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी कायम असणार आहे. लग्नासाठी फक्त ५० लोकांना संमती, कोणत्याही कारणाने गर्दी करण्याची संमती नाही अंत्य संस्कारासाठी २० लोकांना संमती शक्य असेल त्या कंपन्यांनी वर्क फ्रॉम होमचा पर्याय स्वीकारण्याचीही सूचना देण्यात आली आहे
पहिल्या टप्प्यात
आठ जूनपासून धार्मिक, प्रार्थना स्थळे खुली होणार.
हॉटेल, रेस्टॉरंट सेवा सुरु होणार.
शॉपिंग मॉल उघडणार.
दुसऱ्या टप्प्यात
शाळा, कॉलेज, शैक्षणिक संस्था, कोचिंग क्लास यांच्या बाबतीत जुलै महिन्यात निर्णय घेतला जाईल
तिसऱ्या टप्प्यात
आंतरराष्ट्रीय हवाई प्रवास, मेट्रो रेल्वे,
सिनेमा हॉल, जीम, मनोरंजन उद्याने, जलतरण तलाव, थिएटर, बार, हॉल,
क्रीडा, मनोरंजन, धार्मिक कार्यक्रम आणि अन्य कार्यक्रमांना परवानगी देण्यासंदर्भात निर्णय घेण्यात येईल.


















