न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१. जून. २०२०) :- खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींची येरवडा कारागृहातून शुक्रवारी सुटका झाली. त्यावेळी दुचाकी व चारचाकी वाहनातून रॅली काढणाऱ्यांना विश्रांतवाडी पोलिसांनी अटक केली. यामध्ये पिपरी पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखेच्या कर्मचारीही होता. रॅलीतील मोटारीतून एक गावठी पिस्टल पाच जिवंत काडतूस हस्तगत करण्यात आली आहेत. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यावर गुन्हे शाखेच्या त्या कर्मचाऱ्यास पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी निलंबित केले आहे. शरीफ बबन मुलाणी (वय ३६, रा. भोसरी) असे निलंबित करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
मुलानी हा गुन्हे शाखेच्या खंडणी / दरोडा विरोधी पथकात होता. शुक्रवारी त्याची ड्युटी भोसरीमध्ये लावण्यात आली होती. मात्र कामाच्या ठिकाणी तो हजर न राहता खूनाच्या गुन्ह्यातील पॅरोलवर सुटलेल्या आरोपीचे स्वागत करण्यासाठी तो येरवडा कारागृह येथे गेला. आरोपीची सुटका झाल्यावर त्याची दुचाकी आणि चारचाकी वाहनातून रॅली काढण्यात आली होती.