न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१. जून. २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरात आज सोमवारी चिंचवडेनगरमध्ये एका तरुणाला कोरोनाची लागण झालेली आहे. चिंचवडेनगर परिसरात आजपर्यंत एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळला नव्हता. तसेच शहरातील करोनाबाधितांमध्ये रविवारी नव्याने ११ जणांची भर पडली आहे. यामध्ये तीन पुरुषांचा तर आठ महिलांचा समावेश आहे.
त्यामुळे शहरातील करोनाबाधितांचा आकडा ५२३ वर पोहोचला आहे. हे रुग्ण इंदिरानगर, चिंचवड स्टेशन, रुपीनगर, पिंपरी, बौद्धनगर, वाल्हेकरवाडी व दत्तनगर येथील रहिवासी आहेत. तर १३ जण रविवारी करोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे करोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या २६२ इतकी झाली आहे.