न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ जून २०२०) :- केंद्राने वन नेशन ‘एक देश एक रेशन कार्ड’ योजना लागू आहे. या योजनेद्वारे कोणताही रेशनकार्डधारक राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यानुसार कोणत्याही राज्यातल्या रेशन डेपोवरुन धान्य घेऊ शकतो.
या योजनेनुसार लाभार्थ्यांची ओळख ही त्यांच्या आधार कार्डवर असलेल्या इलेक्ट्रॉनिक पॉइंट ऑफ सेल डिव्हाइसद्वारे केली जाऊ शकते. कारण यामध्ये लाभार्थ्यांची माहिती फिड करण्यात आली आहे. केंद्र सरकार राज्यांना दहा अंकाचे रेशन कार्ड क्रमांक जारी केले. या क्रमांकाच्या आधीचे दोन क्रमांक राज्याचे कोड असतील आणि त्यानंतरचे दोन नंबर रेशन कार्ड क्रमांक असेल.
या योजनेमुळे रेशन कार्ड धारक देशभरातील कोणत्याही रेशनच्या दुकानांमधून स्वस्त दरांमध्ये धान्य खरेदी करू शकणार आहे. या योजनेमुळे भ्रष्टाचाराला आळा बसेल, अशी अपेक्षा सरकारकडून व्यक्त करण्यात येत आहे. तर कामानिमित्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणाऱ्या कामगारांनाही अनुदानित धान्यापासून वंचित राहावं लागणार नसल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं आहे. फक्त जुन्या रेशन कार्डला नियमांनुसार अपडेट करण्यात येईल. ज्याद्वारे पुर्ण देशात ते लागू होईल.