- आनंदनगर, बौध्दनगर, काळेवाडी, पिंपरी, वाकड, चिखलीतील १४ रुग्ण कोरोनामुक्त…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ जून २०२०) :- पिंपरी-चिंचवड शहरात सोमवारी दिवसभरात १३ करोना बाधित रुग्ण आढळले आहेत. यात ९ पुरुष व ४ महिलांचा समावेश आहे. तसेच पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील मावळ व शिरूर या परिसरातील तीन जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे.
नव्याने आढळलेले बाधित रुग्ण हे सांगवी, पिंपरी, थरमॅक्स चौक, साईनाथनगर, निगडी, दिघी या परिसरातील रहिवासी असून त्यांच्यासह २१८ रुग्णांवर महानगरपालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शहरातील करोना बाधितांची संख्या ५३५ वर पोहचली आहे. आठ रुग्णांचा मृत्यू झालेला आहे.
आज आनंदनगर, बौध्दनगर, काळेवाडी, पिंपरी, वाकड, चिखलीतील १४ रुग्णांची चाचणी निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आत्तापर्यंत २७६ जणांना घरी सोडण्यात आले असून सर्व जण ठणठणीत बरे झालेले आहेत.