- महापालिकेच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे – नगरसेवक उत्तम केंदळे…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ जून २०२०) :- प्रभाग १३ मधील निगडी साईनाथनगरमध्ये आज आढळलेला रुग्ण हा येथील नसून तो मारुंजीतील आहे. काही दिवसांपूर्वी तो साईनाथनगर येथे राहिला. मारुंजी येथे पॉझिटिव्ह झाला. तो कामत हॉस्पिटल व आता वायसीएम रुग्णालयात उपचार घेत आहे. त्याच्या घरातील व्यक्ती निगेटिव्ह आहेत. त्या व्यक्तीचा जुना पत्ता साईनाथनगर येथील असल्यामुळे या रुग्णांची नोंद निगडी साईनाथनगर अशी झाली आहे. मुळात तो मारुंजीचा रहिवाशी आहे. महापालिकेच्या वतीने परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून काही भाग सील करण्यात येईल. हे सर्व आपल्या भल्यासाठीच आहे. त्यामुळे नागरिकांनी गोंधळून न जाता महापालिकेच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, असे आवाहन नगरसेवक उत्तम केंदळे यांनी प्रभागातील नागरिकांना प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड शहरातील कोरोनाची परिस्थिती आणि आपल्या प्रभागतील परिस्थिती पाहता पूर्णपणे विरोधाभास म्हणजे आत्तापर्यंत आपल्या प्रभागात एकही रुग्ण सापडला नाही. एकंदरीत प्रभागात येणारे भाग निगडी, यमुनानगर, साईनाथनगर व से. न. २२ या भागात आत्तापर्यंत एकही रुग्ण पॉझिटिव्ह सापडला नाही. कारण प्रभागातील नगरसेवक कमल घोलप, सुमन पवळे, सचिन चिखले यांनी दिलेल्या सूचना, माहिती, नियम आणि काळजी घेण्यासाठी सांगितलेल्या सूचना सर्व नागरिकांनी अमलात आणल्या व आम्ही सर्व नगरसेवकांनी व पालिकेने मागील अडीच महिन्यापासून केलेल्या विविध प्रभावी उपाययोजना व नागरिकांनी दिलेला प्रतिसाद यामुळे आपला भाग सुरक्षित राहिला आहे. सर्व नागरिकांना आवाहन करताना यापुढेही असेच सहकार्य करावे, असे नागरिकांनी सांगण्यात आले आहे आणि सर्व नागरिकांचे स्वागत व आभार नगरसेवक प्रा उत्तम केंदळे यांनी मानले आहे.
यापुढे आणि सध्या परिस्थिती अशी माहिती देताना सांगितले की, साईनाथनगरमध्ये थोडा भाग भविष्यात सील करण्यात येईल. परंतु तेथे पॉझिटव रुग्ण सापडला नाही. परंतु जो रुग्ण पॉझिटिव्ह सापडला तो काही दिवसांपूर्वी साईनाथनगर येथे राहिला आहे व पुण्यात मारुंजी येथे पॉझिटिव्ह झाला तसेच कामत हॉस्पिटल नंतर वायसीएम येथे उपचार चालू आहेत. त्यांच्या घरातील व्यक्ती निगेटिव्ह आहेत. त्या व्यक्तीचा पत्ता साईनाथनगर येथील असल्यामुळे बातम्या मध्ये साईनाथनगर निगडी असे येत आहे. पालिकेच्या वतीने तो थोडा भाग पुढील संसर्ग होऊ नये म्हणून सील करण्यात येईल.
त्याठिकाणी कोणीही पॉझिटिव्ह नाही प्रतिबंधक उपाय म्हणून सील करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांना काही समस्या, संशय असल्यास चारही नगरसेवक यांमध्ये कोणालाही संपर्क करून चालू स्थितीची माहिती घ्यावी तसेच अफवांवर विश्वास ठेवू नका, काळजी करू नका, सावध रहा, सुरक्षितता आपल्या सर्वाच्या हाती, कोरोनाचे नियम पाळू असा संदेश नागरिकांना केंदळे यांनी या पत्रकाद्वारे दिला आहे.