न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २ जून २०२०) :- आमदार श्री पै महेशदादा लांडगे युवा मंच, कुदळवाडी व भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने भोसरी विधानसभा मतदारसंघातील कुदळवाडीत सोमवारी (दि. १ जून) रोजी महापालिकेच्या शाळेत ५१ जणांनी या रक्तदान संपन्न झाले.
सोशल डिस्टन्सिंगचे योग्य पालन करून, परिसरातील ५१ जणांनी या रक्तदान शिबिरात रक्तदान केले. यावेळी नागरिकांना मास्क, सॅनिटायझर, होमिओपॅथी गोळ्यांचे मोफत वाटप करण्यात आले.
कोरोना विषाणूच्या धर्तीवर राज्यभर रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे सरकारने रक्तदात्यांना रक्तदान करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत हे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते, अशी माहिती ‘ फ ‘ प्रभागाचे स्वीकृत नगरसदस्य दिनेश यादव यांनी दिली.
यावेळी आमदार महेशदादा लांडगे, आमदार पैलवान महेश लांडगे व भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष संकेत चौंधे, आनंदा यादव, स्थानिक नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते


















