न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २ जून २०२०) :- पोलीस बांधवांचे आरोग्य सुरक्षित राहण्यास मदत व्हावी या दृष्टीने शहर मनसेने सांगवी पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व पोलीस बांधवांना नुकतेच हाेमओपॅथीक औषधांचे वाटप केले आहे.
कोविड १९ (कोरोना) लॉकडाउन परिस्थितीत रस्त्यावर उभे राहून आपले कर्तव्य निभावणाऱ्या पोलीस बांधवाना शहर मनसेने मदतीचा हात देत, मनसेचे पिं. चिं. शहर उपाध्यक्ष राजू सावळे यांनी सांगवी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुळींग यांच्याकडे ही होमिओपॅथिक औषधे सुपूर्द केली.
यावेळी डाॅ. सुशांत चासकर, विशाल पाटील, महेश केदारी आदी उपस्थित होते.


















