- दापोडीतील ८० वर्षीय वृद्धाचा कोरोनामुळे मृत्यू…
- किवळे, आनंदनगर, पिंपळे सौदागर, वाकड, बौध्दनगर, भोसरी, काळेवाडी, निगडी, काळेवाडी पिंपरीतील रुग्ण कोरोनामुक्त…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ जून २०२०) :- पिंपरी-चिंचवड शहरात शुक्रवारी दिवसभरात ४४ करोना बाधित रुग्ण आढळले आहेत. यात २३ पुरुष व २१ महिलांचा समावेश आहे. शिवाय पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील खेड तालुक्यातील एका पुरुषाला कोरोनाची बाधा झालेली आहे. तसेच आज शहरातील दापोडीमधील ८० वर्षीय वृद्धाचा व राजगुरुनगर मधील ५८ वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे.
आज चाचणी अहवाल सकारात्मक (पॉझिटीव्ह) आलेले रुग्ण पिंपळे गुरव, दापोडी, वाकड, आनंदनगर, चिंचवड, कासारवाडी, पिंपरी, च-होली, भोसरी, काळेवाडी, रुपीनगर, अजंठानगर येथील रहिवासी आहेत. महानगरपालिकेच्या रुग्णालयात २२६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शहरातील करोना बाधितांची संख्या ६७८ वर पोहचली आहे. आजपर्यंत शहरातील बारा रुग्णांचा मृत्यू झालेला आहे.
आज पिंपरी चिंचवड शहरातील किवळे, आनंदनगर, पिंपळे सौदागर, वाकड, बौध्दनगर, भोसरी, पिंपरी, निगडी, काळेवाडी फाटा शिवाय शहराच्या हद्दीबाहेरील येरवडा, देहुरोड, सोलापूर, जुन्नर, खडकी, आंबेगाव येथील बाधित रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आत्तापर्यंत ४०१ जणांना घरी सोडण्यात आले असून सर्व जण ठणठणीत बरे झालेले आहेत.














