न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ६ जून. २०२०) :- चक्रीवादळामुळे झालेली आपत्ती हाताळण्यात महापालिका प्रशासनास अपयश आले आहे, असा आरोप सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी केला आहे. महापालिका सर्वसाधारण सभेत आपत्ती व्यवस्थापनावर चर्चा झाली.
सुजाता पालांडे म्हणाल्या, आपत्तीत पडलेली झाडे उचलली नाही, आज एकही अधिकारी फिल्डवर नाही, प्रशासन झोपले होते. हर्षल ढोरे म्हणाले, प्रशासन झोपलेले आहे. सांगवीतही झाडे पडली आहेत. मंगला कदम म्हणाल्या, आपत्कालीन व्यवस्था असावी. डॉ. वैशाली घोडेकर म्हणाल्या, आपत्ती व्यवस्थापनास मनुष्यबळ द्यावे, धरण भरलं तरी पाणी नाही. हे सत्ताधाऱ्याचे अपयश. संदीप वाघेरे म्हणाले, सत्ताधारी की आयुक्त अपयशी आहे, हे कळत नाही. कैलासनगर भागात पाणी शिरलं, झाडे पडली आहेत. दत्ता साने म्हणाले. दोन दिवस मुसळधार पाऊस पडत आहे. आपत्कालीन व्यवस्था सक्षम नाही. विकास डोळस म्हणाले.आपत्ती व्यवस्थापन आहे की नाही कळत नाही.


















