न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ७ जून २०२०) :- फायनान्स कंपनीकडे फ्लॅट गहाण ठेवून त्यानंतर त्याची परपस्पर विक्री केल्याची घटना ताथवडे येथे घडली. गणेश शिवाजी लोखंडे (रा. ताथवडे) असे आरोपीचे नाव आहे. संतोष पंडितराव शहाणे (वय ४१, रा. ताथवडे) यांनी याबाबत शुक्रवारी (दि. ५) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
ही घटना ३१ ऑगस्ट २०१७ ते ५ जून २०२० या कालावधीत ताथवडे येथे घडली. फिर्यादी शहाणे यांनी आरोपी लोखंडे यांच्याकडून फ्लॅट खरेदी केला आहे. मात्र त्या फ्लॅटवर आरोपी लोखंडे याने एका फायनान्स कंपनीकडून कर्ज घेतले होते. तसेच कर्जाचे हप्तेही भरले नाहीत. शहाणे यांनी फ्लॅट खरेदी केल्यावर फायनान्स कंपनीने फ्लॅट सील केला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच शहाणे यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.














